रत्नागिरीत आशीष शेलार यांची भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट
रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज चिपळूण येथील उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. श्री. शेलार आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट नियोजित होती. या भेटीसाठी भास्कर जाधव संपर
भास्कर जाधव यांच्या कार्यालयात आशीष शेलार यांचे स्वागत


रत्नागिरी, 15 जुलै (हिं.स.) । राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज चिपळूण येथील उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

श्री. शेलार आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट नियोजित होती. या भेटीसाठी भास्कर जाधव संपर्क कार्यालयात उपस्थित होते. मात्र श्री. शेलार यांना पोहोचण्यास उशीर झाल्याने श्री. जाधव नियोजित पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

या भेटीमागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील या नेत्यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. भेट अपूर्ण राहिल्याने आता या घडामोडीबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande