
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजे जामडी (ज) ता. कन्नड येथे ६७ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शिवसेना आमदार संजना जाधव यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये महादेव मंदिर सभागृह २५ लक्ष रु., दोन नवीन शाळा वर्गखोल्या २२ लक्ष रु., स्मशानभूमी संरक्षण भिंत २० लक्ष रु. आदी कामांचा समावेश आहे.
आजवर आपल्या सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली तर काही प्रगतीपथावर आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामाला प्राधान्य देत यापुढेही अधिकाधिक निधी उपलब्ध करून नवी विकासकामे मंजूर करण्यासाठी आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार संजना जाधव यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis