अमरावती जिल्ह्यातील ५६ शालेय वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओ स्तरावर प्रलंबित
अमरावती, 15 जुलै (हिं.स.)। अमरावती शहर व जिल्ह्यातील तब्बल ५६ स्कूल बस आणि व्हॅन वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या वाहनांमधून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे.जिल्ह्यात ३० जूनपासून शाळा सुरू झा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ५६ शालेय वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओस्तरावर प्रलंबित


अमरावती, 15 जुलै (हिं.स.)। अमरावती शहर व जिल्ह्यातील तब्बल ५६ स्कूल बस आणि व्हॅन वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या वाहनांमधून दररोज शेकडो विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे.जिल्ह्यात ३० जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बस, व्हॅन आणि ऑटोंमधून विद्यार्थ्यांची नियमित वाहतूक सुरू झाली.

मोटार वाहन कायद्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची शाळा सुरू होण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फिटनेस तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण ९९६ स्कूल बस आणि व्हॅनची नोंदणी आहे. त्यापैकी ९४० वाहनमालकांनी आपल्या वाहनांची फिटनेस तपासणी पूर्ण केली आहे. मात्र, वारंवार नोटिसा बजावूनही ५६ वाहनमालकांनी वाहनांची फिटनेस चाचणी करून घेतलेली नाही. विना फिटनेस धावणाऱ्या शालेय वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक आणि मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्कूल वाहनमालकांना फिटनेस तपासणी करून घेण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतरही विनाफिटनेस धावणाऱ्या शालेय वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande