
बीड, 15 जुलै, (हिं.स. ) श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी आपेगाव येथील पालखी-दिंडीचे पाटोदा शहरात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या सुमारे ८५० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी-दिंडी सोहळ्याचे पाटोदा शहरात स्वागत करत पालखीचे दर्शन घेतले.ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. याप्रसंगी पाटोदा शहराचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis