एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त अलिबाग आगारात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
रायगड, १५ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त अलिबाग आगारात वृक्षारोपणाचा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध सामाजिक
Tree plantation at Alibaug depot for a green Maharashtra.


रायगड, १५ जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त अलिबाग आगारात वृक्षारोपणाचा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध सामाजिक संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

'एक झाड लावूया आणि पर्यावरण वाचवूया' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे पर्यावरणीय तसेच मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. अलिबाग आगार परिसरात फळझाडे, फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यासोबतच लावलेल्या रोपांचे संवर्धन व जतन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशीव-चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, अलिबाग आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे, स्थानक प्रमुख अभिजीत मांढरे, ॲड. निहा राऊत, ॲड. के. डी. पाटील, जागृती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जागृती बेलेकर, डॉ. नितीन गांधी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, एसटीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande