बीड आश्रम शाळा संस्था चालकाची महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला शासकीय कार्यालयात मारहाण
बीड, 16 जुलै, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील अंतरवन पिंपरी तांडा येथील आश्रमशाळा संस्थाचालक दिनेश लाला पवार याने महिला कर्मचाऱ्याच्या पतीला समाजकल्याण कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरचे व शेतातील काम न केल्याने महिलेचे ६ महि
शासकीय कार्यालयात मारहाण


बीड, 16 जुलै, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील अंतरवन पिंपरी तांडा येथील आश्रमशाळा संस्थाचालक दिनेश लाला पवार याने महिला कर्मचाऱ्याच्या पतीला समाजकल्याण कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरचे व शेतातील काम न केल्याने महिलेचे ६ महिन्यांचे वेतन रोखल्याचाही आरोप आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande