नाशिक - सायबर भामट्याकडून पावणेदहा लाखांचा गंडा
अॅप इन्स्टॉल करण्याच्या बहाण्याने केली फसवणूक नाशिक, 16 जुलै (हिं.स.)। डॉक्टरांची अपॉईंटमेंट बुकिंग करण्याचा बहाणा करून एका सायबर भामट्याने एका इसमास अॅप इन्स्टॉल करण्याच्या निमित्ताने पावणेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबा
नाशिक - सायबर भामट्याकडून पावणेदहा लाखांचा गंडा


अॅप इन्स्टॉल करण्याच्या बहाण्याने केली फसवणूक

नाशिक, 16 जुलै (हिं.स.)। डॉक्टरांची अपॉईंटमेंट बुकिंग करण्याचा बहाणा करून एका सायबर भामट्याने एका इसमास अॅप इन्स्टॉल करण्याच्या निमित्ताने पावणेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी दि. २५ जून ते ५ जुलै यादरम्यान अज्ञात मोबाईलधारकाने अर्जदाराच्या पत्नीला डॉक्टरांची अपॉईंटमेंट बुकिंग करण्याचा बहाणा करून

अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास अपॉईंटमेट बुकिंग पाच नावाचे सांगितले. अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर अज्ञात इसमाने तक्रारदाराच्या बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँके च्या खात्यातून फिर्यादीच्या संमतीशिवाय ९ लाख ७५ हजार ६०१ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande