
बीड, 16 जुलै (हिं.स.)। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्यातील न्यायालयीन कोठडीतील आरोपी सनदी अधिकारी असलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या जामिनावर काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यावर आता मंगळवारी (दि. २१) सुनावणी होणार असून दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला तर त्याच दिवशी त्यावरचा निर्णय देखील येऊ शकतो.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मागील वर्षात दाखल झालेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्यात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी
असलेल्या बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठकला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अविनाश पाठकच्या जमीन अर्जावर सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. अभय वाघवसे यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान अविनाश पाठकच्या वतिने सिनिअर कौन्सिल राजेंद्र देशमुख यांनी युक्तिवाद केला होता, त्यात लवादाचे सर्व आदेश नियमात राहूनच काढण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis