
बीड, 16 जुलै, (हिं.स.)। बीड शहरातील बारकुल हॉस्पिटल ते तहसील कार्यालय मार्गे नगर रोडकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्ता कामाचा शुभारंभ आज आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, या विकासकामाचे भूमिपूजन स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित असल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खराब रस्त्यामुळे वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच नागरिकांना दैनंदिन कामांसाठी त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रस्ता कामाला अखेर सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभआणि गतिमान होणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी स्थानिक नागरिक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामाच्या शुभारंभामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis