वर्धा : बालिकेची निर्घृण हत्या, संशयित ताब्यात
वर्धा,16 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्याच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अवघ्या 12 वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घूण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने ति
संग्रहित  लोगो


वर्धा,16 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्याच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अवघ्या 12 वर्षीय बालिकेची दगडाने ठेचून निर्घूण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली

आहे. बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार करून ही

हत्या करण्यात आली असावी, असा तीव्र

संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सावंगी पोलीस

ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावापासून काही अंतरावर, शेतातील एका घरात या बालिकेचा विवस्त्र मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून

आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली आणि पाहता पाहता लगतच्या तीन ते

चार गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बालिकेचे कुटुंब हे अत्यंत गरीब

असून ते सालाने (वर्षभराच्या करारावर) शेतात काम करतात. घटनेची माहिती मिळताच

पोलिसांनी तातडीने धाव घेऊन तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी

तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. बालिकेवर अत्याचार

झाला आहे की नाही, याचा अधिकृत

खुलासा वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या नराधम आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके

रवाना करण्यात आली असून, आरोपीला

लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान

या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सूरू असल्याचे

पोलीस सूत्रांनी सांगितले.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande