नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेहभेट
नांदेड, 16 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने, बँकेचे माजी संचालक मोहनराव पाटील टाकळीकर यांची गणेशनगर, नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत विविध विषयां
Q


नांदेड, 16 जुलै (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने, बँकेचे माजी संचालक मोहनराव पाटील टाकळीकर यांची गणेशनगर, नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी टाकळीकर परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांचा सस्नेह सन्मान करण्यात आला.

या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण साहेब, आ. राजेश पवार, आ. अमरनाथ राजूरकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, उमरीचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, गंगाधरराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande