नांदेडकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी व्यापक पाऊल
नांदेड, 16 जुलै, (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी व रस्ते विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. गेल्या दोन वर्षांपासू
अ


नांदेड, 16 जुलै, (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी व रस्ते विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (CSIR-CRRI) कडे आम्ही करत असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश आले आहे. संसदीय आश्वासन क्र. २६९/४२ अंतर्गत नांदेडच्या सर्वंकष वाहतूक सर्वेक्षणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून, मनपाने आवश्यक सेवा शुल्क जमा केले आहे. लवकरच ' सीआरआरआय' ची तज्ज्ञ टीम नांदेडमध्ये दाखल होऊन सर्वेक्षणाचे काम सुरू करणार आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व कृती आराखडा या मध्ये प्रामुख्याने फेरीवाला मुक्त क्षेत्र मध्ये गजबजलेला बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, डॉक्टर लेन, मुथा चौक आणि कलामंदिर परिसर येथील कोंडी फोडण्यासाठी हा भाग 'नो हॉकर्स झोन' घोषित करून फेरीवाल्यांना पर्यायी जागा दिली जाईल.

रस्ता रुंदीकरण संदर्भात आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरातील रस्त्यातील अडथळा ठरणारी जुनी भिंत मागे घेऊन रस्ता २० फूट रुंद केला जाईल. यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.

आधुनिक वाहतूक नियंत्रण मध्ये संपूर्ण शहरात अत्याधुनिक ट्रॅफिक सिग्नल, सीसीटीव्ही यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईन आणि रिफ्लेक्टर बसवले जातील.

पार्किंग व पायाभूत सुविधा यामध्ये रस्त्यावरील दुहेरी पार्किंग बंद करून स्वतंत्र 'पार्किंग झोन' तयार करणे, उच्च क्षमतेचे एलईडी दिवे आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पदपथ तयार केले जातील.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभागांना कालबद्ध मर्यादेत काम करण्याचे निर्देश दिले असून, या कामांचा दरमहा आढावा घेतला जाईल. याप्रसंगी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी ना.वा.श.म.न.पा. अपर आयुक्त गिरीश कदम आणि सर्व प्रमुख अधिकारी यांची टीम, पोलीस वाहतूक शाखेचे आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रमुख अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी, संबंधित प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande