परभणी : एसआयआर मोहिमेत प्रगती नाही; अधिकारी-कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस
परभणी, 16 जुलै, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण(एसआयआर) मोहिम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. मोहिमेतंर्गत प्रत्येक मतदान केंद्रावरील गणना फॉर्म निर्धारित कालावधीत शंभर टक्के भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेण्य
परभणी : एसआयआर मोहिमेत प्रगती नाही; अधिकारी-कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस


परभणी, 16 जुलै, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण(एसआयआर) मोहिम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. मोहिमेतंर्गत प्रत्येक मतदान केंद्रावरील गणना फॉर्म निर्धारित कालावधीत शंभर टक्के भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. या आढाव्यात काही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील एसआयआर कामाची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून, याबाबत खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-नोटीस बजावलेले सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी

१)गंगाखेड विधानसभा - बी. टी. बहिराम, संयजकुमार देशपांडे, शोयब खान व किरण सुरडवाड

२)जिंतूर विधानसभा - बी. एस. नांदापूरकर, उमेश ढाकणे, के. बी. जाधव व शितल कच्छवे

३)परभणी विधानसभा - डी. पी. कुपटेकर, तुकाराम कदम, गजानन जाधव व आवेज हाश्मी

४)पाथरी विधानसभा - शौकत मुबारक पठाण गोविंद कोल्हे, रमेश धोपे व अजित सुरवसे

-नोटीस बजावलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी

१)परभणी विधानसभा - कुंडलिक चोखोबा मुजमुले (भाग क्र. २३३), कांबळे जे. डी. (भाग क्र. १२४), सोमनाथ बोरामने (भाग क्र. २१८), एन. बी. सोनटक्के (भाग क्र. १९०)

२)जिंतूर विधानसभा - अब्दुल गफार जब्बार शेख (भाग क्र. ३०६), नागिले शंकर अण्णाराव (भाग क्र. ७६), एच. एस. खिरे (भाग क्र. ४२१) व भूरके के. पी. (भाग क्र. ३८)

३)गंगाखेड विधानसभा - श्रीरामे बालाजी तुकाराम (भाग क्र. ३९५), नागार्जन लक्ष्मणराव कनसे (भाग क्र. २२५), रामेश्वर सोपानराव भोसले (भाग क्र. ३४७) व समाधान बाबाराव गडदे (भाग क्र. ६१)

४) पाथरी विधानसभा - एन. टी. वाघ (भाग क्र. १८८), गौरव जाधव (भाग क्र. ३०३), पवार दत्ता केशव (भाग क्र. ३६३) व नदीम अहमद रहीम खान (भाग क्र. ३६१)

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसआयआर कार्यक्रमास सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून गणना फॉर्म शंभर टक्के भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि निर्धारित मुदतीत काम पूर्ण करणे, याबाबत काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एसआयआर अभियानाची कामे निर्धारित वेळेत, अचूक आणि शंभर टक्के पूर्ण करून लोकशाही बळकट करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय योगदान द्यावे.

-संजयसिंह चव्हाण

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande