मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना रायगडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; ८६७ नागरिकांना आरोग्यसेवा
रायगड, 16 जुलै (हिं.स.)। : मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ''प्रोजेक्ट आशादीप'' अभियानाला रायगड जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत
Overwhelming response to Chief Minister's Jan Arogya camps in Raigad; 867 citizens received healthcare services across 13 camps.


रायगड, 16 जुलै (हिं.स.)। : मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'प्रोजेक्ट आशादीप' अभियानाला रायगड जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात १३ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, ८६७ लाभार्थ्यांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे.

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, पंचायत समिती अलिबागच्या सभापती भाग्यता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री आंधळकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात नागरिकांची रक्तदाब (BP), रक्त तपासणी (CBC), रक्तातील साखर (BSL), ईसीजी (ECG), नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्मान भारत कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणीसह आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एएनसी (ANC) क्लिनिक आयोजित करण्यात आले असून एका लाभार्थ्यास एचपीव्ही (HPV) लसीकरण करण्यात आले. या शिबिरात ८७ ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

याच अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, रेवदंडा (ता. अलिबाग) येथेही आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २३४ नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

जिल्हाभरात सुरू असलेल्या 'प्रोजेक्ट आशादीप' अभियानातून ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी, विविध वैद्यकीय तपासण्या, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. आगामी काळातही जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande