
नाशिक, 16 जुलै (हिं.स.)। कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत असलेल्या डेजी वेलनेस स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून तीन परप्रांतीय महिलांची सुटका करून स्पा मालक महिला, मॅनेजर व तेथे आढळून आलेल्या दोन ग्राहकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रचीती गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की दि. १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत असलेल्या डेजी वेलनेस स्पा सेंटरच्या मालक आरोपी कविता पवन कोरडे (वय ४३, रा. रुक्मिणी सोसायटी, मखमलाबाद रोड, पंचवटी), मॅनेजर अर्चना संजय मोरे (वय ३२, रा. आनंदछाया बस स्टॉपजवळ, सातपूर) यांच्यामार्फत ग्राहक आरोपी आशुतोष चंद्रकांत अमृते (वय ४५, रा. प्रसन्न सोसायटी, माणेकशानगर, द्वारका), रवी भागवत (वय ४२, रा. मखमलाबाद गाव) अशी आरोपींची नावे आहेत. तीनही मालक व मॅनेजर यांनी संगनमत करून परप्रांतीय तीन महिलांकडून तेथे येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे आकारून कुंटणखाना चालवीत असताना प्रत्यक्षरीत्या मिळून आल्या.या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी कविता कोरडे, अर्चना मोरे, आशुतोष अमृते व रवी भागवत यांच्याविरुद्ध स्त्रियांचा अनैतिक प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवाद करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV