मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’; रायगड जिल्ह्यात १०० हून अधिक विशेष आरोग्य शिबिरे
रायगड, 16 जुलै (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरात १०० हून अधिक विशेष आरोग्य
### **मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’; रायगडमध्ये १०० हून अधिक विशेष आरोग्य शिबिरे**  **अलिबाग, दि. १६ :** मुख्यमंत्री **देवेंद्र फडणवीस** यांच्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात **मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’** अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरात **१०० हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन** करण्यात आले असून, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.  या अभियानात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत **५६**, संलग्नित खासगी रुग्णालयांमध्ये **२०**, तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील **यूएचडब्ल्यूसी, यूपीएचसी आणि एचबीटी** स्तरावर **२८** विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय विविध स्तरांवरही शिबिरे भरविण्यात येणार असून, एकूण शिबिरांची संख्या शंभरपेक्षा अधिक असणार आहे.  या आरोग्य शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आवश्यक निदान व उपचार, **आयुष्मान वय वंदना कार्ड** आणि **आभा (ABHA) कार्ड** नोंदणी, रक्तदान शिबिरे, लेप्टोस्पायरोसिसबाबत जनजागृती तसेच दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  विशेष महाआरोग्य शिबिरांचे आयोजन **२२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय अलिबाग, प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली आणि उपजिल्हा रुग्णालय पनवेल**, **२४ जुलै रोजी माणगाव**, **२७ जुलै रोजी रोहा** आणि **२९ जुलै रोजी श्रीवर्धन** येथे करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन **जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, रायगड** आणि **सार्वजनिक आरोग्य विभाग** यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रायगड, 16 जुलै (हिं.स.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत ‘प्रोजेक्ट आशादीप’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरात १०० हून अधिक विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

या अभियानात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत ५६, संलग्नित खासगी रुग्णालयांमध्ये २०, तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील यूएचडब्ल्यूसी, यूपीएचसी आणि एचबीटी स्तरावर २८ विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय विविध स्तरांवरही शिबिरे भरविण्यात येणार असून, एकूण शिबिरांची संख्या शंभरपेक्षा अधिक असणार आहे.

या आरोग्य शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी, आवश्यक निदान व उपचार, आयुष्मान वय वंदना कार्ड आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणी, रक्तदान शिबिरे, लेप्टोस्पायरोसिसबाबत जनजागृती तसेच दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विशेष महाआरोग्य शिबिरांचे आयोजन २२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय अलिबाग, प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली आणि उपजिल्हा रुग्णालय पनवेल, २४ जुलै रोजी माणगाव, २७ जुलै रोजी रोहा आणि २९ जुलै रोजी श्रीवर्धन येथे करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, रायगड आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande