विलास घुले हत्या प्रकरण; उमेश मानेविरुद्ध अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा
बीड, 16 जुलै (हिं.स.) :केज तालुक्यात गाजलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या उमेश माने याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांचा मृत्यू झाला होता, त्याच उमेश मानेविरुद्ध आता महिलेवर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल
अत्याचार व ब्लॅकमेलिंग चा गुन्हा


बीड, 16 जुलै (हिं.स.) :केज तालुक्यात गाजलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या उमेश माने याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांचा मृत्यू झाला होता, त्याच उमेश मानेविरुद्ध आता महिलेवर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नव्या घडामोडीमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे.

तक्रारीनुसार, उमेश माने याने पीडित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या घटनेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे.

भीती आणि दबावामुळे पीडित कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या कुटुंबीयांना वारंवार धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या वादातून एका हॉटेलमध्ये हाणामारी झाली आणि या झटापटीत विलास घुले यांचा मृत्यू झाला.

या हत्या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध नवा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली असून तपासाला नवे वळण मिळाले आहे.

पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास करून सत्य समोर आणण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande