रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या संपर्कप्रमुखपदी डॉ. अनंत खराडे यांची निवड
रायगड, 16 जुलै (हिं.स.) : रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच कोलाड येथे उत्साहात पार पडली. या सभेत संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत वामन खराडे यांची एकमताने
## रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी डॉ. अनंत खराडे यांची एकमताने निवड  **कोलाड | प्रतिनिधी :** रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच कोलाड येथे उत्साहात पार पडली. या सभेत संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत वामन खराडे यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाचे जिल्हाध्यक्ष सुदाम बापू शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.  डॉ. अनंत खराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असून, गरजू व गरीब नागरिकांना मदतीचा हात देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक जनजागृती आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांत त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे.  त्यांच्या कार्याची दखल घेत रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने त्यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजबांधवांसह युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  नियुक्तीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. अनंत खराडे म्हणाले, रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. समाजबांधवांना एकत्रित करून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


रायगड, 16 जुलै (हिं.स.) : रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच कोलाड येथे उत्साहात पार पडली. या सभेत संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत वामन खराडे यांची एकमताने निवड करण्यात आली.संघाचे जिल्हाध्यक्ष सुदाम बापू शिंदे यांच्या हस्ते डॉ. अनंत खराडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. अनंत खराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असून, गरजू आणि गरीब नागरिकांना मदतीचा हात देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक जनजागृती तसेच विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने त्यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजबांधव आणि युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande