चांदूरबाजार तालुक्यातील २२ गावे होणार 'स्मार्ट व इंटेलिजेंट'
विकासासाठी १८० दिवसांचा आराखडा तयारजि.प. सीईओ सत्यम गांधी यांच्याकडून गावांची पाहणी अमरावती, 17 जुलै (हिं.स.) । ग्रामीण भागाचा सर्वांगीण व तंत्रज्ञानाधारित विकास साधण्यासाठी शासनाने राबविलेल्या ''स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज'' प्रकल्पात अमरावती
चांदूरबाजार तालुक्यातील २२ गावे होणार 'स्मार्ट व इंटेलिजेंट'


विकासासाठी १८० दिवसांचा आराखडा तयारजि.प. सीईओ सत्यम गांधी यांच्याकडून गावांची पाहणी

अमरावती, 17 जुलै (हिं.स.) । ग्रामीण भागाचा सर्वांगीण व तंत्रज्ञानाधारित विकास साधण्यासाठी शासनाने राबविलेल्या 'स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज' प्रकल्पात अमरावती जिल्ह्यातील २३ गावे असून त्यात चांदूरबाजार तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्हापरिषदेकडून सुरू करण्यात आली असून या २३ गावांच्या विकासासाठी १८० दिवसांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील २२ गावांची माहिती घेण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी बुधवारी चांदूरबाजार पंचायतसमितीला भेट देवून काही गावांना भेटी देऊन माहीती घेतली.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये राज्यातील एकूण ७५ गावांचा' स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज' अंतर्गत विकास साधल्या जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने चांदूरबाजार तालुक्यातील २२ गावांचा, तर अमरावती तालुक्यातील शिराळा गावासह चांदूरबाजार तालुक्यातील बोराळा, बेलोरा, चिंचोली काळे, वडुरा, खरवाडी, खराळा, जवळा शहापूर,जैनपूर, तळवेल, रसुल्लापूर, कृष्णापूर, विरुळ पूर्णा, आसेगाव, टाकरखेडा पूर्णा, तळणी पूर्णा, धानोरा, सर्फाबाद, फुबगाव, राजुरा, बेसखेडा, शिरजगाव बंड, हैदतपूर या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावांमध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, ई-आरोग्य सेवा, पशुसंवर्धन सुविधा, महिला व बालकल्याण विभागाच्या ऑनलाइन सेवा, स्मार्ट कृषी सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आदी अत्याधुनिक सुविधा टप्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ भारतनेट फेज-२ नेटवर्कच्या माध्यमातून आवश्यक तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देणार आहे. याची अंमलबजावणी सुरूझाली असून सीईओ यांनी स्वतः या गावांना भेटी दिल्या आहेत. ही गावे १८० दिवसांत 'स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज' म्हणून घोषित करावयाची असल्याने या गावांमध्ये विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande