
यवतमाळ 17 जुलै (हिं.स.)।
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्!यांना अधीसंख्या पदावर नियमित केल्या जाणार आहे. त्या अनुषंगाने कंत्राटी कर्मचार्!यांचे कागदपत्रे संकलन करण्यास सुरवात झाली आहे. दैनंदिन शेकडो कर्मचार्!यांची गर्दी आरोग्य विभागात राहत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात मागील १५ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. अतिशय तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी कर्तव्य बजावत होते. या अभियानाअंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत, कंत्राटी अधिकार्!यांसह कर्मचार्!यांचे समायोजन करावे, अशी मागणी सातत्याने केल्या जात होती. मध्यंतरी नागपूर येथे अधिवेशनावर मोर्चासुद्धा काढण्यात आला होता. तर २०२३ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्!यांनी कामबंद आंदोलन केले होते. सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन शासनाने कंत्राटी कर्मचार्!यांना नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही अतिशय संथगतीने ही कार्यवाही केल्या जात होती. आता मात्र, शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, अधीसंख्य पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात सुमारे ५७५ कंत्राटी कर्मचार्!यांचा समावेश आहे. दरम्यान, संपूर्ण कर्मचार्!यांना कागदपत्रे जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचार्!यांची चांगलीच झुंबड उडत आहे. शेकडो कर्मचार्!यांची कागदपत्रे आतापर्यंत जमा झाली आहे. असे असलेतरी आता नियमित करण्याची कार्यवाही कशा पद्धतीने केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात २६५ कर्मचार्!यांचे समायोजन?
नव्या शासन निर्णयानुसार दहा वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचार्!यांचे वेतनश्रेणीतील समकक्ष अधीसंख्य पदांवर समायोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कार्यरत ५७५ कंत्राटी कर्मचार्!यांपैकी दहा वर्षापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या २६५ कर्मचार्!यांना पहिल्या टप्यात समायोजन केले जाण्याची शक्यता आहे. यात प्रथम क्रमांक नेमका कोणत्या संवर्गाचा लागेल ही येणारी वेळच ठरवेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी