बीड - बनावट अभिलेख प्रकरणात ऑल इंडिया पॅंथर सेनेची कठोर कारवाईची मागणी
बीड, 17 जुलै, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील कपिलधार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात ऑल इंडिया पॅंथर सेनेने कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लातूर येथे नितीन सो
कारवाईची मागणी


बीड, 17 जुलै, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील कपिलधार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात ऑल इंडिया पॅंथर सेनेने कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लातूर येथे नितीन सोनवणे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना तसेच पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पीएसआय यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या प्रतिनिधींनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांचीही भेट घेतली. बीड जिल्ह्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावाचा गैरवापर करून चालू असलेल्या कथित नियोजनबद्ध रॅकेटबाबत उपलब्ध पुरावे व माहिती सादर करण्यात आली. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पॅंथर सेनेचे मत:

सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत पॅंथर सेनेने दोषींवर कारवाई होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हा पदाधिकारी सुंदर वाघमारे, राहुल शिरोळे, सुनील गायकवाड, आकाश औसरमल, बालाजी लोकरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande