नांदेडमध्ये एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
नांदेड, 17 जुलै (हिं.स.) : विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेला अधिक गती देण्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. भोकर, अर्धापूर आणि मुदखेड या तीनही तालुक्यांतील भाजपचे बूथ अध्यक्ष,
अ


नांदेड, 17 जुलै (हिं.स.) : विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेला अधिक गती देण्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

भोकर, अर्धापूर आणि मुदखेड या तीनही तालुक्यांतील भाजपचे बूथ अध्यक्ष, बूथ लेव्हल एजंट (बीएलए), शक्तीकेंद्र प्रमुख आणि निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते. भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या बैठकीत मोहिमेचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच मतदार यादीमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचे नाव समाविष्ट करण्यासाठी आगामी काळात करावयाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande