छ. संभाजीनगर - छ. शिवाजी महाराज स्वाभिमान समाधान अभियान तसेच महा रक्तदान शिबिराचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान समाधान अभियान’ तसेच ‘महा रक्तदान शिबिर’ यांच्या नियोजनासंदर्भात भारती
Q


छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान समाधान अभियान’ तसेच ‘महा रक्तदान शिबिर’ यांच्या नियोजनासंदर्भात भारतीय जनता पार्टी जालना महानगर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची संयुक्त आढावा बैठक भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीस महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अंबड उपनगराध्यक्ष विश्वजीत खरात, अशोक आण्णा पांगारकर, अनिल कोलते यांच्यासह महानगर व ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान समाधान अभियान’ प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, प्रत्येक गाव व शहरात अभियान यशस्वीपणे राबविणे तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते व प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार अभियान आणि महा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. संघटनात्मक बळकटी, जनसंपर्क वाढविणे आणि सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीस भारतीय जनता पार्टी जालना महानगर व ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते तसेच प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande