
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.)।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेचे स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये यांनी आयोजित केलेला देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
यानिमित्ताने खडकेश्वर परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर येथील खडकेश्वर परिसरात स्वच्छता अभियानाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते
या कार्यक्रमाला महापौर श्री. समीरदादा राजुरकर, स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री. महेश मल्लेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. उज्वलाताई दहिफळे यांच्यासह मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis