हिंगणघाटच्या सुपुत्राची भारतीय नौदलात भरारी
डॉ. वेदान्त जायस्वाल यांची ‘लेफ्टनंट’ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती वर्धा, 17 जुलै (हिं.स.) : देशसेवेचे व्रत अंगीकारून सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (AFMC) प्रवेश घेताना उराशी बाळगलेले स्वप्न हिंगणघाटचे सुपुत्र डॉ. वेदान्त समीर जायस्वाल
हिंगणघाटचा सुपुत्र डॉ. वेदान्त जायस्वाल नौदलात लेफ्टनंट


डॉ. वेदान्त जायस्वाल यांची ‘लेफ्टनंट’ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती

वर्धा, 17 जुलै (हिं.स.) : देशसेवेचे व्रत अंगीकारून सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात (AFMC) प्रवेश घेताना उराशी बाळगलेले स्वप्न हिंगणघाटचे सुपुत्र डॉ. वेदान्त समीर जायस्वाल यांनी साकार केले आहे. भारतीय नौदलात ‘लेफ्टनंट’ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवत त्यांनी आपल्या ध्येयवेड्या प्रवासाचा यशस्वी टप्पा गाठला आहे.देशासाठी प्राण पणाला लावून सेवा करण्याच्या दृढ निश्चयाने सुरू केलेला वेदान्तचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वेदान्तच्या आयुष्यात वडिलांच्या अकाली निधनाचे मोठे संकट आले होते. मात्र, या कठीण काळात त्यांची आई दीप्ती जायस्वाल यांनी मुलाच्या स्वप्नांना स्वतःच्या संघर्षातून बळ दिले. आईची जिद्द, आजी नंदरानी जायस्वाल यांचे आशीर्वाद आणि काका नितीन जायस्वाल यांचे भक्कम पाठबळ यामुळे वेदान्तने परिस्थितीवर मात करत यश मिळवले.पुण्यातील प्रतिष्ठेच्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून (AFMC) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेदान्त यांची थेट भारतीय नौदलात अधिकारी म्हणून निवड झाली.पुण्यातील लष्करी कॅम्पसमध्ये पार पडलेला पदवीदान सोहळा भावनिक क्षणांचा साक्षीदार ठरला. नौदलाचा मानाचा गणवेश परिधान करून आणि खांद्यावर लेफ्टनंटची पदके धारण केल्यानंतर वेदान्त यांनी सर्वप्रथम आपल्या आईला सलाम केला. आईच्या संघर्ष आणि त्यागाप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता उपस्थितांसाठी भावूक करणारी ठरली.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande