
बीड, 17 जुलै (हिं.स.)।दोन गटात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले टाकळी (ता. केज) येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण केज तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत विलास घुले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis