FinX कडून Franklin Templeton National Mutual Fund Olympiad च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
* Groww नॉलेज पार्टनर ; देशभरातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू मुंबई, 17 जुलै (हिं.स.) : पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर FinX ने Franklin Templeton National Mutual Fund Olympiad (FTNMFO) 2026 चे दुसरे पर्व
FinX Franklin Templeton


* Groww नॉलेज पार्टनर ; देशभरातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू

मुंबई, 17 जुलै (हिं.स.) : पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर FinX ने Franklin Templeton National Mutual Fund Olympiad (FTNMFO) 2026 चे दुसरे पर्व जाहीर केले आहे. Groww या उपक्रमाचा आहे नॉलेज पार्टनर. BFSI Sector Skill Council of India आणि FPA Edutech या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. दुसऱ्या पर्वात देशभरातील 1,000 महाविद्यालयांमधील 50,000 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे FinX चे उद्दिष्ट आहे. भारतातील सर्व शैक्षणिक शाखांतील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

पहिल्या पर्वात देशातील 400 हून अधिक महाविद्यालयांतील 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे ही स्पर्धा भारतातील विद्यार्थी-केंद्रित आर्थिक साक्षरता उपक्रमांपैकी एक ठरली. तरुणांमध्ये गुंतवणुकीविषयी जागरूकता वाढवण्यासाठीही या उपक्रमाने विश्वासार्ह व्यासपीठ निर्माण केले.

दुसऱ्या पर्वात सहभागी विद्यार्थ्यांच्या गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पना, म्युच्युअल फंड, आर्थिक नियोजन, संपत्तीनिर्मिती, बाजारपेठेतील संकल्पना आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींबाबतच्या ज्ञानाचे मूल्यमापन केले जाईल. संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी नोंदणी पोर्टलद्वारे सहभागी होऊ शकतात.

देशातील अनेक नामांकित शिक्षणसंस्थांनी या पर्वात सहभाग नोंदवला आहे. यात IIM Bangalore, IIM Indore, IIM Vizag, IIT Kharagpur, IIT Dhanbad, VIT Vellore, IIFT Kolkata, Delhi Technological University (DTU), BITS Goa, Christ University आणि Lady Shri Ram College (Delhi University) यांचा समावेश आहे.

या संस्थांचा सहभाग ऑलिम्पियाडची वाढती विश्वासार्हता अधोरेखित करतो. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकविषयक ज्ञान वाढवण्यासाठी हे राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

FinX च्या तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमुळे ऑलिम्पियाडची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे. नोंदणीपासून मूल्यमापन, विश्लेषण आणि विद्यार्थी सहभागापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे व्यवस्थापन FinX करते. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक शिक्षणाचा हा उपक्रम अधिक कार्यक्षमतेने राबवता येत आहे.

Franklin Templeton Asset Management (India) Pvt. चे अध्यक्ष श्री. अविनाश सातवळेकर म्हणाले, “Franklin Templeton National Mutual Fund Olympiad च्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून तरुण भारतीयांना वर्गाबाहेरील व्यावहारिक आर्थिक ज्ञान मिळवण्याची वाढती इच्छा दिसून आली. Franklin Templeton मध्ये आम्ही आर्थिक साक्षरतेला जीवनातील आवश्यक कौशल्य मानतो. ऑलिम्पियाडसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास देतात. बदलत्या गुंतवणूकविश्वाचे आकलन वाढवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावतात.”

FinX चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हिमांशू व्यापक म्हणाले, “Franklin Templeton National Mutual Fund Olympiad हे शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्राला जोडणारे वेगळे व्यासपीठ बनले आहे. या माध्यमातून आर्थिक शिक्षण अधिक रंजक, सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त बनते. दुसऱ्या पर्वात आम्ही अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आणि महाविद्यालयांमधील सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताच्या बदलत्या आर्थिक परिसंस्थेतील संधी आणि जबाबदाऱ्यांसाठी सज्ज असलेली आर्थिकदृष्ट्या जागरूक पिढी घडवण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील.”

या ऑलिम्पियाडच्या माध्यमातून Franklin Templeton आणि FinX आर्थिक साक्षरता वाढवण्याची आपली सामायिक बांधिलकी पुढे नेत आहेत. शैक्षणिक संस्था आणि उद्योगक्षेत्र यांना एकत्र आणून विद्यार्थ्यांना बदलत्या आर्थिक परिसंस्थेचा सामना करण्यासाठी आवश्यक ज्ञान, आत्मविश्वास आणि व्यावहारिक समज देण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.

दीर्घकालीन गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीबाबत विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करणे हाही या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande