लोहिया कॉर्पचा आयपीओ २३ जुलैपासून सब्सक्रिप्शनसाठी होणार खुला
मुंबई, 20 जुलै (हिं.स.)। टेक्स्टाइल क्षेत्रासाठी मशिनरी आणि पूरक उपकरणे तयार करणाऱ्या लोहिया कॉर्प कंपनीने आपल्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओसाठी प्राइस बँड आणि इश्यूचा आकार जाहीर केला आहे. कंपनीचा १,१०२.०८ कोटी रुपयांचा आयपीओ २३ जुलैपासून
Lohia Corp


Lohia Corp


मुंबई, 20 जुलै (हिं.स.)। टेक्स्टाइल क्षेत्रासाठी मशिनरी आणि पूरक उपकरणे तयार करणाऱ्या लोहिया कॉर्प कंपनीने आपल्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओसाठी प्राइस बँड आणि इश्यूचा आकार जाहीर केला आहे. कंपनीचा १,१०२.०८ कोटी रुपयांचा आयपीओ २३ जुलैपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून २७ जुलैपर्यंत त्यामध्ये अर्ज करता येणार आहे. कंपनीने प्रति समभाग ४०४ रुपये ते ४२५ रुपये असा प्राइस बँड निश्चित केला असून एका लॉटमध्ये ३५ समभागांचा समावेश असेल.

किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी म्हणजेच ३५ समभागांसाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी १४ हजार ८७५ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एका किरकोळ गुंतवणूकदाराला कमाल १३ लॉट म्हणजेच ४५५ समभागांसाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी १ लाख ९३ हजार ३७५ रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल. या आयपीओअंतर्गत दर्शनी मूल्य एक रुपया असलेले एकूण २ कोटी ५९ लाख ३१ हजार ४०७ समभाग ऑफर फॉर सेलद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

या सार्वजनिक समभाग विक्रीत क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी किमान ७५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमाल १० टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्ससाठी कमाल १५ टक्के हिस्सा राखीव आहे. या इश्यूसाठी इक्वीरस कॅपिटल लिमिटेडची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.

आयपीओ बंद झाल्यानंतर २८ जुलै रोजी समभागांचे वाटप निश्चित केले जाईल. वाटप झालेल्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात २९ जुलै रोजी समभाग जमा केले जातील. त्यानंतर ३० जुलै रोजी कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

कंपनीने सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार तिची आर्थिक कामगिरी सातत्याने मजबूत होत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीला ११७.८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तो पुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वाढून १९३.४५ कोटी रुपयांवर पोहोचला. याच कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न १,३८६.४७ कोटी रुपयांवरून १,७३७.८७ कोटी रुपयांपर्यंत वाढले. कंपनीवरील कर्जही २१२.१६ कोटी रुपयांवरून १५२.७८ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले. राखीव निधी आणि अधिशेष ३५८.१४ कोटी रुपयांवरून ५१९.१६ कोटी रुपयांपर्यंत वाढला, तर एबिट्डा २२८.६० कोटी रुपयांवरून ३३९.४५ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने कंपनीची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande