शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ४४३ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि देशांतर्गत बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दबाव दिसून आला. दिवसाची सुरुवातच कमकुवत झाली होती आणि
Stock Market Closing


नवी दिल्ली, 20 जुलै (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि देशांतर्गत बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दबाव दिसून आला. दिवसाची सुरुवातच कमकुवत झाली होती आणि सुरुवातीच्या व्यवहारांपासूनच विक्रीचा जोर कायम राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. मात्र दुपारनंतर काही प्रमाणात खरेदी वाढल्यामुळे बाजाराने तळाच्या पातळीवरून सावरण्याचा प्रयत्न केला. तरीही दिवसअखेर सेन्सेक्स ०.५७ टक्के, तर निफ्टी ०.३९ टक्क्यांनी घसरून लाल निशाणात बंद झाले.

बीएसईचा सेन्सेक्स ७८,१५१.४५ अंकांवर उघडल्यानंतर विक्रीच्या दबावामुळे तो घसरत जाऊन एका टप्प्यावर ७७,३६८.२९ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीला सुरुवात केल्याने निर्देशांकात ४०० हून अधिक अंकांची सुधारणा झाली. अखेरीस सेन्सेक्स ४४२.९३ अंकांच्या घसरणीसह ७७,७०८.५२ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे एनएसईचा निफ्टी २४,१९०.०५ अंकांवर व्यवहार सुरू करून २४,१३५.८५ अंकांपर्यंत घसरला. दुपारनंतर झालेल्या खरेदीमुळे तो काहीसा सावरला, मात्र शेवटी ९५.८० अंकांच्या घसरणीसह २४,२३८.५० अंकांवर बंद झाला.

दिवसभर बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्समध्ये सातत्याने विक्री झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचाही निर्देशांक घसरणीसह बंद झाला. याउलट फार्मास्युटिकल, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, मेटल, ऑईल अँड गॅस, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी क्षेत्रांमध्ये खरेदीचा कल दिसून आला. यामुळे ब्रॉडर मार्केटमध्ये चांगली कामगिरी झाली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.६० टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.१६ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

मुख्य निर्देशांक घसरले असले तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील मजबूत खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून ४८२.६७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी हे मूल्य ४८०.८३ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.८४ लाख कोटी रुपयांची भर पडली.

दिवसभरात बीएसईमध्ये ४,५१४ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,२२६ शेअर्स वाढीसह, २,०३९ शेअर्स घसरणीसह, तर २४९ शेअर्स स्थिर बंद झाले. एनएसईमध्ये २,९८५ शेअर्समध्ये व्यवहार झाले असून त्यापैकी १,५७५ शेअर्स वाढले, तर १,४१० शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील ट्रेंट, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, भारती एअरटेल, सिप्ला आणि जेएसडब्ल्यू स्टील हे प्रमुख वाढ नोंदवणारे शेअर्स ठरले. तर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक आणि जिओ फायनान्शियल या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande