रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीला द वीक - हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२६च्या क्रमवारीत स्थान
रत्नागिरी, 17 जुलै, (हिं.स.) । द वीक - हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२६च्या सर्वेक्षणात फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने मुंबई विद्यापीठामध्ये पाचवे स्थान, महाराष्ट्रातील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत विसा
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीला द वीक - हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२६च्या क्रमवारीत स्थान


रत्नागिरी, 17 जुलै, (हिं.स.) । द वीक - हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२६च्या सर्वेक्षणात फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीने मुंबई विद्यापीठामध्ये पाचवे स्थान, महाराष्ट्रातील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत विसावे, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात राष्ट्रीय पातळीवर २६वे, उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १७७वे, उत्कृष्ट सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर २०६वे स्थान पटकावले आहे.

द वीक दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यत्वे महाविद्यालयाची मूलभूत माहिती, पायाभूत सुविधा, बौद्धिक संसाधने, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क आणि संशोधन अभिमुखता या गोष्टीचा विचार करण्यात आला.

फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय १९९६ साली फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. गेल्या ३० वर्षांमध्ये या महाविद्यालयाचा मोठा विस्तार झाला आहे.

कोकणातील विद्यार्थ्यांना उच्य प्रतीच्या अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकासाचे योग्य प्रशिक्षण प्रदान करून, नामांकित आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर ॲकॅडमीचा नेहमीच कल राहिला आहे.

या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उप-प्राचार्य डॉ. मिलिंद यादव यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande