
बीड, 17 जुलै (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गेवराई आगाराला नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस उपलब्ध करण्याबाबत अधिवेशन काळात परिवहन मंत्री ना. श्री. प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. आज गेवराई आगारासाठी 'राजमाता जिजाऊ' या ३ x २ आसन रचनेच्या पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे शनिवार, १८ जुलै रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे.
गेवराई आगारातून मुंबई, पुणे, कल्याण, सोलापूर, पंढरपूर आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत. नवीन पाच बसेस गेवराई आगारात सामील होत असल्यामुळे लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील बसफेऱ्यांनासुद्धा आता चांगल्या दर्जाच्या बसेस उपलब्ध होतील
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis