निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील; राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशावर पडळकरांची सावध भूमिका
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एनडीए प्रवेशाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सावध भूमिका घेतली आहे. या चर्चांबाबत आपण केवळ माध्यमांमधून माहिती ऐकली असून, राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्य
निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील; राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशावर पडळकरांची सावध भूमिका


सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एनडीए प्रवेशाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सावध भूमिका घेतली आहे. या चर्चांबाबत आपण केवळ माध्यमांमधून माहिती ऐकली असून, राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार की नाही, याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पडळकर म्हणाले, हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय आहे. याबाबत मला अधिक माहिती नाही. योग्य वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील.

यावेळी त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवरही भाष्य केले. जयंत पाटील यांना मंत्रीपद मिळाले किंवा नाही, याचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी त्यावर अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

राज्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईचे समर्थन करत, देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना पडळकर म्हणाले की, प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करायची आणि आता रामरक्षेचे आंदोलन करायचे, ही भूमिका जनता पाहत आहे. तसेच, मौलाना जरजिस अन्सारी यांच्या संदर्भात बोलताना त्यांच्या डीएनए तपासणीची आवश्यकता असल्याचे मतही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande