राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतले माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन
नांदेड, 17 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेतले .महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनींच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. नांदे
अ


नांदेड, 17 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेतले .महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनींच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या पवित्र माहूर गडावर कुलस्वामिनी श्री रेणुका मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

महाराष्ट्राचे परम श्रद्धास्थान आणि ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्या रेणुका मातेच्या चरणी लीन होताना लाभलेली शांतता आणि आत्मबळ शब्दातीत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात वाटचाल करत असताना अशा पवित्र वास्तू आपल्याला नेहमीच जनसेवेची आणि अधिक ताकदीने काम करण्याची प्रेरणा देतात.

आई रेणुकेच्या चरणी साकडे घालताना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनींच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. लोकसेवेचे हे व्रत अखंडपणे चालू ठेवण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रेणुका माता शक्ती आणि आत्मबळ देवो, हाच आशीर्वाद मागितला.

आदिशक्तीचा हा आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे. आई रेणुकेची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव कायम राहो!

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande