एसआयआर कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा संदेश चुकीचा; 29 जुलैपर्यंतच गणना पत्रक जमा करण्याचे आवाहन
नांदेड, 17 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा चुकीचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनर
एसआयआर कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा संदेश चुकीचा; 29 जुलैपर्यंतच गणना पत्रक जमा करण्याचे आवाहन


नांदेड, 17 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी मुदतवाढ मिळाल्याचा चुकीचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र राज्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमास अद्याप कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी 29 जुलै 2026 पर्यंत संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे गणना पत्रक (Enumeration Form - EF) भरून जमा करावे व निवडणूक विभागास सहकार्य करावे.

याची सर्व पात्र मतदार, बूथ लेव्हल एजंट (BLA), लोकप्रतिनिधी तसेच निवडणूक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.

तसेच, एसआयआर कार्यक्रमाबाबत कोणतीही अप्रमाणित अथवा चुकीची माहिती, दिशाभूल करणारे संदेश, वृत्त किंवा बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित अथवा शेअर करू नयेत. अधिकृत माहितीलाच प्राधान्य देऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande