नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील बिनविरोध संचालकांचे खा. अशोक चव्हाणांकडून अभिनंदन
नांदेड, 17 जुलै (हिं.स.) : नांदेड जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीबद्दल खासदार अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंद
अ


नांदेड, 17 जुलै (हिं.स.) : नांदेड जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीबद्दल खासदार अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, मीनल पाटील खतगावकर, मारोतराव कवळे गुरुजी, श्रीनिवास चव्हाण, प्रणिता देवरे चिखलीकर, सुशीला हणमंतराव बेटमोगरेकर पाटील, पूनम राजेश पवार, शिवराम लुटे आणि कैलास देशमुख गोरठेकर यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित संचालकांनी बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार अशोक चव्हाण यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande