
लातूर, 17 जुलै, (हिं.स.) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या (मराविमं अधिकारी संघटना) लातूर परिमंडळाची सन २०२६-२७ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी देविदास सुरवसे, तर सचिवपदी अजित जैन यांची निवड झाली.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संतोष सांगोळे (बीड) व मनोज पेटकर (लातूर), कार्याध्यक्षपदी आनंद गंजी, सहसचिवपदी सतीश जावळेकर (लातूर), महेश चव्हाण (धाराशिव) आणि शरद गदळे (बीड) यांची निवड झाली. कोषाध्यक्षपदी गजानन लवराळे (लातूर), महिला प्रतिनिधी म्हणून सविता पवार (बीड), प्रसिद्धीप्रमुखपदी धनंजय पवार (लातूर), विधी सल्लागार म्हणून ॲड. चेडे, तर सल्लागार म्हणून चेतन वाघ आणि जालिंदर मंगळवेढेकर (लातूर) यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेचे कामकाज सहाय्यक महाव्यवस्थापक चेतन वाघ, वरिष्ठ व्यवस्थापक जालिंदर मंगळवेढेकर आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर यांनी पाहिले.
पदभार स्वीकारल्यानंतर सचिव अजित जैन यांनी वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी विभागातील अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी ही संघटना तिन्ही वीज कंपन्यांतील अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करेल, असे सांगितले. अध्यक्ष देविदास सुरवसे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच संघटनेला अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी नूतन कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल अधिकारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis