कॅलिबर मायनिंगचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला; २४ जुलै रोजी लिस्टिंगची शक्यता
नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.)। कोळसा मायनिंग क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कॅलिबर मायनिंग अँड लॉजिस्टिक्स कंपनीचा ४५० कोटी रुपयांचा आयपीओ गुरुवारी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २१ जुलैपर्यंत बोली लावता येणार आहे. इश्यू
New IPO Caliber Mining


नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.)। कोळसा मायनिंग क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कॅलिबर मायनिंग अँड लॉजिस्टिक्स कंपनीचा ४५० कोटी रुपयांचा आयपीओ गुरुवारी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २१ जुलैपर्यंत बोली लावता येणार आहे. इश्यू बंद झाल्यानंतर २२ जुलै रोजी शेअर्सचे अलॉटमेंट होईल, तर २३ जुलै रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. कंपनीचे शेअर्स २४ जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. सबस्क्रिप्शनच्या पहिल्याच दिवशी सकाळी साडेअकरापर्यंत हा आयपीओ ४६ टक्के भरला होता.

या आयपीओसाठी प्रति शेअर ४०२ ते ४२४ रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये ३५ शेअर्स ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉटसाठी म्हणजेच ३५ शेअर्ससाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी १४ हजार ८४० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कमाल १३ लॉट म्हणजे ४५५ शेअर्ससाठी अर्ज करता येणार असून त्यासाठी १ लाख ९२ हजार ९२० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. या आयपीओअंतर्गत १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एकूण १,०६,१३,२०७ शेअर्सची विक्री केली जाणार आहे. त्यापैकी सुमारे ४०० कोटी रुपयांचे ९४,३३,९६२ नवीन शेअर्स जारी करण्यात येणार आहेत, तर सुमारे ५० कोटी रुपयांचे ११,७९,२४५ शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत.

अँकर इन्व्हेस्टर्सना शेअर्सचे अलॉटमेंट झाल्यानंतर उर्वरित इश्यूमधील २८.५७ टक्के हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय ५० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, तर २१.४३ टक्के हिस्सा नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव आहे. या इश्यूसाठी डॅम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेडची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड रजिस्ट्रारची भूमिका पार पाडणार आहे.

कंपनीने सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार गेल्या तीन आर्थिक वर्षांत आर्थिक कामगिरीत सातत्याने सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ९५.९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तो २०२४-२५ मध्ये १३१.५५ कोटी रुपयांवर पोहोचला, तर २०२५-२६ मध्ये वाढून १५७.९० कोटी रुपये झाला. महसूलही याच कालावधीत ९५७.९२ कोटी रुपयांवरून १,४३५.५७ कोटी आणि त्यानंतर १,६८४.६६ कोटी रुपयांपर्यंत वाढला. मात्र कंपनीच्या कर्जात चढ-उतार दिसून आले. २०२३-२४ अखेरीस ७१७.८८ कोटी रुपयांचे कर्ज असलेली कंपनी २०२४-२५ मध्ये ६४९.२७ कोटी रुपयांवर आली, परंतु २०२५-२६ अखेरीस कर्ज पुन्हा वाढून १,०५७.६१ कोटी रुपयांवर गेले. दुसरीकडे कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस, नेटवर्थ आणि ईबीिटीडीए या सर्व आर्थिक निर्देशांकांमध्ये सातत्याने वाढ नोंदवली गेली असून त्यामुळे कंपनीची आर्थिक क्षमता अधिक मजबूत झाल्याचे चित्र समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande