वनमहोत्सव २०२६ : बीडमध्ये सवलतीच्या दरात २० लाख रोपे उपलब्ध
बीड, १७ जुलै (हिं.स.) : सामाजिक वनीकरण विभाग, बीड यांच्या वतीने वनमहोत्सव २०२६ निमित्त ''हरित बीड, समृद्ध बीड'' या संकल्पनेतून सवलतीच्या दरात विविध प्रकारची दर्जेदार रोपे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यंदा ४० ते ५० स्थानिक प्रजातींची सुमा
वन महोत्सव २०२६


बीड, १७ जुलै (हिं.स.) : सामाजिक वनीकरण विभाग, बीड यांच्या वतीने वनमहोत्सव २०२६ निमित्त 'हरित बीड, समृद्ध बीड' या संकल्पनेतून सवलतीच्या दरात विविध प्रकारची दर्जेदार रोपे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यंदा ४० ते ५० स्थानिक प्रजातींची सुमारे २० लाख रोपे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.उपलब्ध रोपांमध्ये नीम, वड, पिंपळ, उंबर, बेल, करंज, कांचन, साग, हिरडा, बेहडा, आवळा, पेरू, सिताफळ आदी विविध वन व फळझाडांच्या प्रजातींचा समावेश आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुढील दोन आठवड्यांसाठी, तसेच बीएसएनएल कार्यालय, बीड येथे वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोप विक्री सुरू राहणार आहे. याशिवाय, बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयांमध्येही रोप विक्रीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सवलतीच्या दरातील रोप विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा आणि 'हरित बीड, समृद्ध बीड' या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande