सोलापूर : नाल्यांच्या कामांत भ्रष्टाचाराचा आरोप; खा. प्रणिती शिंदेंनी केली चौकशीची मागणी
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील नाल्यांची कामे, पाणीपुरवठा, पुलांचे बांधकाम तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेली अनेक विकासकामे रखडली असून, सोलापूर महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. शहर
Praniti Shinde solparu


सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील नाल्यांची कामे, पाणीपुरवठा, पुलांचे बांधकाम तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेली अनेक विकासकामे रखडली असून, सोलापूर महापालिका भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीत नाल्यांची बांधकामे, नालेसफाई, विस्कळित पाणीपुरवठा, नगरोत्थान निधी, आसरा पूल आणि दमाणी नगर पुलाची कामे यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान काही कामांच्या संथ गतीबाबत आणि अनियमिततेबाबत खासदार शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. नाल्यांच्या कामांमध्ये आणि गाळ काढण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी, ज्या कंत्राटदारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यालाच नाल्यांच्या बांधकामाची कामे देण्यात आल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. अनेक ठिकाणी नाल्यांची कामे अद्याप अपूर्ण असून प्रमुख नाल्यांची सफाईही योग्य पद्धतीने झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरातील रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने जबाबदारीने काम करून प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी अपेक्षाही खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande