राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
पुणे, 17 जुलै (हिं.स.)। भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सन २०२६-२७ मधील समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मा
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या निधी योजनांसाठी २१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


पुणे, 17 जुलै (हिं.स.)।

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या सन २०२६-२७ मधील समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

इमारत बांधकाम व विस्तार, ग्रंथालयांचे आधुनिकीकरण, 'ज्ञान कोपरा' व 'बालकोपरा' विकसित करणे, महोत्सवी वर्ष साजरे करणे तसेच चर्चासत्र, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी अर्थसहाय्य या योजनांचा यात समावेश आहे.

इच्छुक ग्रंथालयांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रती संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर कराव्यात. तसेच प्रस्ताव राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही सादर करावेत.

योजनांची सविस्तर माहिती, नियम व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande