लातूरचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे निधन; आ. अमित देशमुखांकडून कुटुंबीयांचे सांत्वन
लातूर, 17 जुलै (हिं.स.)। लातूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांच्या अकस्मित निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्व स्तरांत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक मान्यवर, सहकारी
सांत्वन पर भेट


लातूर, 17 जुलै (हिं.स.)। लातूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांच्या अकस्मित निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्व स्तरांत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक मान्यवर, सहकारी आणि नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

शुक्रवारी दुपारी आमदार अमित देशमुख यांनी सहकाऱ्यांसह एम. जे. हॉस्पिटल परिसरातील डॉ. राठोड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्या मातोश्री मीनाताई राठोड, पत्नी डॉ. प्रियांका राठोड तसेच राठोड परिवारातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत दिवंगत डॉ. मेहुल राठोड यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande