रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी संजय नाईकडे
रायगड, 17 जुलै, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी संजय नाईकडे यांनी शुक्रवारी (दि. 17) पदभार स्वीकारला. प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या
Sanjay Naikade appointed as Primary Education Officer of Raigad Zilla Parishad.


रायगड, 17 जुलै, (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी संजय नाईकडे यांनी शुक्रवारी (दि. 17) पदभार स्वीकारला. प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाईकडे यांची नियुक्ती करण्यात आली.

संजय नाईकडे यांना शैक्षणिक प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी त्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याआधी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी अँड सिक्युरिटी कार्यशाळांचे आयोजन, तसेच मूल्यवर्धन कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्कारांची जडणघडण करण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.

रायगड जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संजय नाईकडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या अनुभवाचा लाभ रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande