
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै, (हिं.स.)। भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान राष्ट्रनायक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मरण पंधरवड्या (२३ जून ते ६ जुलै) अंतर्गत भाजपा विभागीय कार्यालयात कार्यकर्ता संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या संमेलनात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, महापौर समीर राजुरकर, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, माजी महापौर बापू घडामोडे, बसवराज मंगरुळे तसेच भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वलाताई दहिफळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन विस्तार, जनसेवा आणि आगामी उपक्रमांबाबत प्रेरणादायी विचार मांडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis