छ. संभाजीनगर - एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने फुलंब्री तालुक्याची महत्त्वाची बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने फुलंब्री तालुक्याची हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली. बूथस्तरावर अचूक व अद्ययावत मतदार नोंदणी व्हावी तस
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 जुलै (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने फुलंब्री तालुक्याची हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली. बूथस्तरावर अचूक व अद्ययावत मतदार नोंदणी व्हावी तसेच अभियानाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मतदारांची मॅपिंग प्रक्रिया वेळेत व पूर्ण क्षमतेने पार पडावी, यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी आमदार सुहासभाऊ शिरसाठ, फुलंब्री विधानसभा प्रमुख अजिनाथ धामणे, सभापती सर्जेराव मेटे, जि.प.सदस्य निखिल चव्हाण, माजी जि.प.सदस्य शिवाजी पाथ्रीकर, सांडूअण्णा जाधव, बाजार समिती संचालक आप्पासाहेब काकडे, हौसाताई काटकर, राजु तुपे, राजेंद्र डकले, ऋषी नरोडे, BLO-2 तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande