अमरावती : शिक्षकांना करावा लागणार ‘कृत्रिम बुद्धिमता’ कोर्स
अमरावती, 17 जुलै (हिं.स.) : इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापनाचे कार्य करणार्!या शिक्षकांना ‘कृत्रिम बुद्धिमता’ कोर्स ऑनलाइन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शिक्षकांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार असून, ३० सप्टेंबर पर्यंत ‘कोर्स’ पूर्ण
शिक्षकांना करावा लागणार ‘कृत्रिम बुद्धिमता’ कोर्स पहिली ते बारावीच्या शिक्षकांचा समावेश


अमरावती, 17 जुलै (हिं.स.) : इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापनाचे कार्य करणार्!या शिक्षकांना ‘कृत्रिम बुद्धिमता’ कोर्स ऑनलाइन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शिक्षकांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार असून, ३० सप्टेंबर पर्यंत ‘कोर्स’ पूर्ण करावा लागणार आहे.

कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहे. याचा योग्य, सुरक्षित आणि जबाबदारपणे वापर केल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया परिणामकारक होईल. दैनंदिन कामकाजाची गती, गुणवत्ता, अचूकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अध्यापन नियोजन, अध्ययन साहित्य निर्मिती, मूल्यमापन, अहवाल लेखन, माहितीचे विश्लेषण, सादरीकरण तयार करणे तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमता आधारित साधनांचा वापर करता येते. त्यामुळे शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमता विषय मूलभूत ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमता व मशीन लर्निंगच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे उपयोग होणार आहे. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंत अध्ययन करणार्!या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमता (एआय) चा ऑनलाइन कोर्स विकसित करण्यात आला आहे. ‘दीक्षा पोर्टल’वर हा कोर्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकतेच शिक्षण मंत्र्यांनी कोर्सचे उद्घाटन केले आहे. या कोर्सकरिता ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार असून, कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांना अवगत करावे, असे स्पष्ट निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande