अमेरिका-इराण युध्दाचे भारतावर होणारे परिणाम विषयावर शनिवारी टिळक भवन मध्ये चर्चासत्र
मुंबई, 17 जुलै (हिं.स.)। अमेरिका इराण युध्द व त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक १८ जुलै, २०२६ रोजी दुपारी ३.३० वा. प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्याल
मुंबई


मुंबई, 17 जुलै (हिं.स.)। अमेरिका इराण युध्द व त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक १८ जुलै, २०२६ रोजी दुपारी ३.३० वा. प्रदेश काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात संरक्षण व युध्द नितीचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण सहानी यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे तर माजी खासदार कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, इराण भारत संबंधाचे अभ्यासक फिरोज मिठीबोरवाला, प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande