लातूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उदगीर पोलिसांची जनजागृती मोहीम
लातूर, 17 जुलै, (हिं.स.)। उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी संग्राम स्मारक विद्यालय व जमहूर उर्दू शाळा येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला पोलीस अंमलदार सोना
पोलिसांची जनजागृती मोहीम


लातूर, 17 जुलै, (हिं.स.)। उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी संग्राम स्मारक विद्यालय व जमहूर उर्दू शाळा येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला पोलीस अंमलदार सोनाली ढगे, पोलीस अंमलदार शिंदे व गोपनीय अंमलदार काळे यांनी विद्यार्थ्यांना महिला व बालक सुरक्षा, 'गुड टच बॅड टच', सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर, वाहतूक नियमांचे पालन तसेच आपत्कालीन मदत क्रमांक ११२ याबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच कायद्याचे पालन करून सुरक्षित, सजग व जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना सम जावून सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. पोलिसांनी त्यांच्या शंकांचे समाधान करत आवश्यक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा व कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande