दानशूर भाविकाकडून श्री विठ्ठल चरणी ५६.५९ लाखांच्या सोन्याच्या पादुका अर्पण
सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असून मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीकडे रोख रकमेबरोबरच सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस
sdfg


सोलापूर, 17 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्यासह देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असून मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीकडे रोख रकमेबरोबरच सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणावर देणग्या प्राप्त होत आहेत.

याच दरम्यान, १६ जुलै रोजी एका दानशूर भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर श्री विठ्ठलाच्या चरणी ४४६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्या. या पादुकांची अंदाजे किंमत ५६ लाख ५९ हजार रुपये इतकी असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या पादुका अहिल्यानगर येथील एका भाविकाने दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या देणगीमुळे श्री विठ्ठलाच्या खजिन्यात आणखी एका मौल्यवान दागिन्याची भर पडली आहे.

यापूर्वी श्री विठ्ठलाला चांदीच्या पादुका परिधान करण्यात येत होत्या. मात्र, आता विविध धार्मिक आणि विशेष प्रसंगी भगवान विठ्ठलाला या सोन्याच्या पादुका परिधान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाविकांकडून सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंचे दान सुरक्षितपणे स्वीकारण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने स्वतंत्र दान कक्षाची व्यवस्था केली आहे. आषाढी यात्रेदरम्यान मंदिराकडे येणाऱ्या देणग्यांमध्ये यंदाही मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande