बीड - प्रभाग चार मध्ये एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी आणि आधार मॅपिंग शिबिर
बीड, 17 जुलै, (हिं.स.)। बीड शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी आणि आधार मॅपिंगसाठी विशेष शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक भारत आण्णा कांबळे या
एस आय आर मोहीम


बीड, 17 जुलै, (हिं.स.)। बीड शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये विशेष मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी आणि आधार मॅपिंगसाठी विशेष शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक भारत आण्णा कांबळे यांच्या संपर्क कार्यालयात प्रभागातील नागरिकांना त्यांच्या मतदानाचा हक्क सुनिश्चित करता यावा यासाठी हा कॅम्प सुरू करण्यात आला आहे.

नगरसेवक भारत आण्णा हे देखील नागरिकांशी फोनद्वारे संपर्क करून एस आय आर करून घेण्यासाठी सांगत आहेत. आज सकाळी दहा वाजल्यापासून या कॅम्प ला सुरुवात झाली असून बीएल ओ हे नागरिकांचे अर्ज स्वीकारत आहेत. प्रभागातील नागरिकांसाठी तीन कॅम्प सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मधील मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन नगरसेवक भारत आण्णा कांबळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande