नाशकातील धरण साठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात रद्द
नाशिक, 17 जुलै (हिं.स.)। - यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे नाशिक महानगरपालिकेने शनिवारची सुरू केलेली पाणी कपात महासभेमध्ये लोकप्रतिनिधींचा आग्रह लक्षात घेता आणि धरणातील परिस्थितीची एकूणच माहिती बघता ही पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल
नाशकातील धरण साठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात रद्द


नाशिक, 17 जुलै (हिं.स.)।

- यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे नाशिक महानगरपालिकेने शनिवारची सुरू केलेली पाणी कपात महासभेमध्ये लोकप्रतिनिधींचा आग्रह लक्षात घेता आणि धरणातील परिस्थितीची एकूणच माहिती बघता ही पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर हिमगौरी आहेर-आडके त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली ही सभा सुरू असताना सभासदांनी शहरामध्ये दर शनिवारची सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली या मागणी वरती सभेमध्ये चर्चा करताना नगरसेवक गुरमित बग्गा, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, हेमलता पाटील, राहुल दिवे व अन्य सदस्यांनी धरणाची एकूणच परिस्थिती बघता पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे पाणी कपात रद्द करण्यात यावी अशी मागणी केली या मागणी वरती प्रशासनाच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आले की सध्याच्या परिस्थितीमध्ये गंगापूर धरण हे 71 टक्के भरले आहे त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार अजून काही दिवस तरी धरण भरून द्यावा लागेल परंतु महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले की, सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता आणि येणाऱ्या काळात पाऊस हा होणार आहे त्यामुळे सध्या सुरू असलेली पाणी कपात ही रद्द करण्याच्या वेळी असे आदेश दिले या आदेशानंतर नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने सध्या सुरू असलेली पाणी कपात ही रद्द करण्याची घोषणा केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande